गोवा : मूर्तीकारांना देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करण्याची अनेक आमदारांची विधानसभेत मागणी

पणजी, १० ऑगस्ट (वार्ता.) – गोवा विधानसभा सभागृहात ९ ऑगस्ट या दिवशी अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना भाजपचे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा आदींनी पारंपरिक श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या मूर्तीकारांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली.

(सौजन्य : Prudent Media Goa) 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या आयातीवर बंदी घालण्याची मागणी भाजपचे आमदार जीत आरोलकर यांनी केली. त्यानंतर झालेल्या चर्चेत मूर्तीकारांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी अनेक आमदारांनी केली. आमदार जीत आरोलकर यांनी त्यांचे सूत्र मांडतांना सरकारने चिकण मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या पारंपरिक मूर्तीकारांना प्रोत्साहन द्यावे आणि प्रतिमूर्ती अनुदान वाढवावे, अशा मागण्या केल्या.


हे ही वाचा –

गोव्यात बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध ! – पारंपरिक मूर्तीकाराचा आरोप
https://sanatanprabhat.org/marathi/706981.html