हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालय, तसेच पोलीस ठाणे येथे निवेदन !
हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम !
पुणे, १० ऑगस्ट (वार्ता.) – शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्या विक्रेत्यांवर कारवाई करून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे, तसेच भोर येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच पोलीस प्रशासन यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
पुणे येथील जिल्हाधिकार्यांना दिलेले निवेदन उपचिटणीस श्रीमती शुभांगी गोंजारे यांनी स्वीकारले. या वेळी समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
भोर येथे निवेदन दिले !
भोर येथील नायब तहसीलदार मनोहर पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार श्री. मनोहर पाटील यांनी ‘प्रतीवर्षी आपण हे उपक्रम करत असता, आपला उपक्रम पुष्कळ चांगला असतो’, असे मत व्यक्त केले. भोर पोलीस ठाण्यात दिलेले निवेदन भोर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस हवालदार सौ. वर्षा भोसले यांनी स्वीकारले.
दोन्ही ठिकाणी निवेदन देण्यासाठी मनसेचे भोर शहर अध्यक्ष शशिकांत वाघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रोहित देशमाने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आकाश आखाडे, राष्ट्रप्रेमी श्री. राहुल शेटे, संतोष शिवतरे, श्री. शरद भिलारे, दीपक फाजगे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. विश्वजित चव्हाण उपस्थित होते.