नागपूर येथील भाजपचे पदाधिकारी सना खान यांच्या खून प्रकरणी एकास अटक !
नागपूर – शहरातील भाजपच्या सक्रीय पदाधिकारी सना खान यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या ८ दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. या प्रकरणात सना खान हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि सना खान यांचा मित्र अमित साहू याचा नोकर जीतेंद्र गौड याला पोलिसांनी ९ ऑगस्ट या दिवशी अटक केली आहे. त्याने सनाचा खून करून मृतदेह हीरन नदीत टाकल्याचे मान्य केले आहे.