लोकलगाडी थांबवणार्‍या महिलेविरोधात गुन्‍हा नोंद

ठाणे, १० ऑगस्‍ट (वार्ता.) – दिवा रेल्‍वेस्‍थानकात ९ ऑगस्‍टला सकाळी मोटरमनच्‍या केबिनमध्‍ये शिरून लोकलगाडी थांबवल्‍याप्रकरणी रेल्‍वे सुरक्षा दलाकडून एका ३० वर्षीय महिलेविरोधात रेल्‍वे कलम कायद्यानुसार गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. जलद रेल्‍वेगाडी फलाट क्रमांक ४ ऐवजी २ वर आली होती. त्‍यामुळे महिलेने हा प्रकार केल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे सुमारे १५ मिनिटे रेल्‍वेगाडी एकाच ठिकाणी उभी होती.