मणीपूरमधील सैन्य मागे घेण्याची ४० आमदारांची मागणी !
पंतप्रधानांना पत्र लिहून केली मागणी
इंफाळ – हिंसाचारग्रस्त मणीपूरमधील ४० आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी तेथील सैन्य मागे घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
मणिपुर के 40 विधायकों का PM को पत्र…विधायकों की PM से असम राइफल्स को हटाने की मांग#ManipurViolence #ManipurIssue pic.twitter.com/e8yg3WtWtC
— Zee Bihar Jharkhand (@ZeeBiharNews) August 10, 2023
या आमदारांमध्ये बहुतांश आमदार हिंदु मैतेही समुदायाचे आहेत. त्यांनी ख्रिस्ती कुकी बंडखोर गटांसोबतचा ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन’चा (एस्.ओ.ओ.चा) करार मागे घेणे, राज्यात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ (एन्.आर्.सी.) कायदा लागू करणे आणि स्वायत्त जिल्हा परिषदांना बळकट करणे इत्यादी मागण्या केल्या आाहेत.