(म्हणे) ‘पुरातत्व विभागाचा खर्च हिंदु पक्षाने न दिल्याने ज्ञानवापीचे सर्वेक्षण त्वरित थांबवावे !’ – अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी
|
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला एक आठवडा झाला असून मुसलमान पक्षापैकी एक असलेली अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी हिने त्या विरोधात जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. या वेळी कमिटीने २१ जुलै २०२३ या दिवशी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा दाखला देत सांगितले की, भारतीय पुरातत्व विभागाला सर्वेक्षण करतांना येणारा सर्व खर्च हिंदु पक्षाने उचलायचा आहे. कमिटीने आरोप केला आहे की, विभागाचा खर्च हिंदु पक्षाकडून दिला जात नसल्याने सर्वेक्षण त्वरित थांबवण्यात यावे. या प्रकरणी १७ ऑगस्ट या दिवशी हिंदु पक्ष त्याची भूमिका मांडणार आहे.
या वेळी कमिटीने पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांच्या कामाच्या पद्धतीवरही आक्षेप घेतला. कमिटीचे म्हणणे आहे की, विभागाचे सदस्य कोणत्याही वेळी सर्वेक्षण चालू करतात. त्यांच्या कामाला कोणतीच समयमर्यादा नसते. त्यांच्या कार्यप्रणालीवरही न्यायालयाने आदेश द्यावेत. यासाठीही सर्वेक्षण थांबवण्यात यावे.
ज्ञानवापी के ASI सर्वे पर मीडिया कवरेज पर रोक लगाने की मांग, कोर्ट पहुंचा मुस्लिम पक्ष @iSamarthS #GyanvapiMosque https://t.co/pbOg5BkyaK
— AajTak (@aajtak) August 9, 2023
ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाची माहिती प्रसारमाध्यमांना न पुरवण्याचा न्यायालयाचा आदेश !
गेल्या आठवड्याभरापासून ज्ञानवापीच्या परिसराचे सर्वेक्षण चालू आहे. यामध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी, तसेच हिंदु आणि मुसलमान पक्ष यांचे सदस्यही सहभागी आहेत. अशातच सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये यासंदर्भातील कोणतीच माहिती न पुरवण्याचा आदेश वाराणसी न्यायालयाने ९ ऑगस्ट या दिवशी दिला. तसेच ज्ञानवापीच्या बाहेर प्रसारमाध्यमांना वार्तांकन न करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
संपादकीय भूमिका
|