पाकमधून संचालित सामाजिक माध्यमांवरील १२ गट नूंह हिंसाचारासाठी उत्तरदायी ! – हरियाणा पोलीस
|
नूंह (हरियाणा) – ३१ जुलै या दिवशी येथे हिंदूंवरील जलाभिषेक यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केल्यानंतर त्याचे अन्वेषण चालू असून प्रतिदिन नवनवीन घटनाक्रम समोर येत आहेत. याच्या अंतर्गत हरियाणा पोलिसांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर आणि टेलीग्राम या सामाजिक माध्यमांवर कार्यरत आणि पाकमधून संचालित अशा १२ गटांची माहिती मिळाली आहे. या गटांमध्ये हरियाणा आणि राजस्थान येथील मेवात प्रांतातील लोक मोठ्या संख्येने जोडले आहेत. या लोकांना भडकावण्याचे मोठे काम या माध्यमातून प्रतिदिन करण्यात येत होते. (यातून हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या गटांमध्ये जोडलेल्या भारतातील सर्व लोकांची आता चौकशी होऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
Nuh violence:12 Pakistani social media groups, with thousands of followers in Haryana and Rajasthan, under police scanner
https://t.co/10OokS09jK— OpIndia.com (@OpIndia_com) August 10, 2023
१. अशातच या हिंसाचाराचे आरोपी मुनसैद आणि सैकुल यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही येथील अरावली डोंगरात लपल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांना घेरले. दोघांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास आरंभ केला. या वेळी उडालेल्या चकमकीत पोलिसांची एक गोळी सैकुलच्या पायात घुसली. या वेळी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
२. पोलिसांनी हिंसाचाराच्या प्रकरणी सैफुल्ला आणि मेहबूब या रोहिंग्या मुसलमानांनाही अटक केली आहे. दोघे अन्य काही रोहिंग्यांसह म्यानमार सीमेतून आसाममध्ये घुसल्याचे त्यांनी स्वीकारले आहे. तसेच आधारकार्ड आणि अन्य कागदपत्रे बनवून घेतल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. नूंहमध्ये साधारण २ सहस्र रोहिंग्या मुसलमान रहात असून हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत २५ रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात २० गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिका
|