शिळी पोळी खाऊन ‘ब १२’ जीवनसत्त्व वाढते का ?
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २२५
‘काही दिवसांपूर्वी सामाजिक प्रसारमाध्यमांतून एक संदेश प्रसारित होत होता. यात ‘प्रतिदिन शिळी पोळी खाल्ल्यास ‘ब १२’ जीवनसत्त्वाची न्यूनता दूर होते’, असे दिले होते. कदाचित या उपायाने ‘ब १२’ जीवनसत्त्व वाढतही असेल; परंतु प्रतिदिन शिळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नव्हे. नियमितपणे शिळे अन्न खाल्ल्याने शरिरातील अग्नी (पचनशक्ती) बिघडतो आणि यामुळे अनेक रोग होऊ शकतात. त्यामुळे ‘ब १२’ जीवनसत्त्वासाठी हा उपाय करणे चुकीचे आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२३)
(लवकरच या लेखांवर आधारित ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येणार आहे.)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan |