उसन्या पैशांसाठी हातोडा डोक्यात घातला !
डोंबिवली – पतीने घेतलेले उसने पैसे मागण्यासाठी घरी आलेल्या राजीव भुयान याने पती घरात नसल्याचे समजताच रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केला. तसेच इंजेक्शनसारखी टोकदार वस्तू तिच्या मानेला टोचून तिला गंभीर घायाळ केले. या प्रकरणी महिलेने तक्रार प्रविष्ट केल्याने राजीवविरोधात गुन्हा नोंद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.