इतिहासाचा विपर्यास करून खोटे कथानक रचले जात आहे ! – रघुजी आंग्रे, सरखेल कान्‍होजी आंग्रे यांचे वंशज

ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक भालचंद्र नेमाडे यांनी हिंदुद्वेषी वक्‍तव्‍य करून औरंगजेबाचे समर्थन केल्‍याचे प्रकरण

रघुजीराजे आंग्रे

‘ज्ञानपीठ’ पुरस्‍कारप्राप्‍त भालचंद्र नेमाडे, माजी न्‍यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील आणि ब्रिगेडी हे इतिहासाविषयी खोटी कथानके रचत स्‍वतःची मुक्‍ताफळे उधळत असतात. नेमाडेंसारखी माणसे इतिहासाचा विपर्यास करून खोटे कथानक (नॅरेटिव्‍ह) रचत असतात. यातून वर्षानुवर्षे हिंदु धर्माची अपकीर्ती केली जात आहे. काशी विश्‍वेश्‍वराविषयीही असेच कथानक रचले जात आहे, ज्‍यामध्‍ये ‘भगवान शिव आणि नंदी यांच्‍यात भांडण झाले अन् त्‍यामुळे नंदी रागावून शिवाकडे पाठ करून बसला आहे’, असे म्‍हटले जात आहे. असे असले, तरी ‘त्‍या कथित मशिदीच्‍या खाली शिवपिंड आहे आणि नंदी त्‍याचा पुरावा आहे’, हे सांगण्‍याचे धाडस नेमाडे का करत नाहीत ? यातून नेमाडे यांनी त्‍यांचे हिंदुविरोधी विचार प्रकट करून स्‍वतःची वैचारिक भ्रष्‍टता स्‍पष्‍ट केली आहे. असली वक्‍तव्‍ये करून नेमाडे यांनी ‘ज्ञानपीठ’ पुरस्‍काराचा अपमान केला आहे. त्‍यामुळे सरकारने असे महत्त्वाचे पुरस्‍कार देतांना सतर्कता बाळगणे आवश्‍यक आहे.


हिंदुद्वेषी वक्‍तव्‍ये करणार्‍या नेमाडेंवर कठोर कारवाई करणे आवश्‍यक ! – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

‘औरंगजेबाच्‍या दोन बायका हिंदूंकडे जात होत्‍या’, हे औरंगजेबाच्‍या बायकांनी नेमाडे यांना सांगितले होते का ? कि त्‍यांच्‍याकडे तसे पुरावे आहेत ? पुराव्‍याविना बोलणे, ही नेमाडे यांची वृत्ती आहे. साहित्‍य हे निष्‍पक्ष असले पाहिजे; पण नेमाडे यांचे साहित्‍य विद्वेषी आहे. नेमाडे हे कायमच हिंदुद्वेषी वक्‍तव्‍ये करत असल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर कारवाई झाली पाहिजे.