मराठा क्रांती मोर्चामुळे शीव-पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी !

मराठा क्रांती मोर्चामुळे शीव-पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी

मुंबई – ओबीसी आरक्षण, महिला आरक्षण, कोपर्डी घटनेतील आरोपींच्‍या शिक्षेची कार्यवाही आदी विविध मागण्‍यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्‍यात आले. शेकडो कार्यकर्ते आल्‍याने शीव-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी ९ ऑगस्‍ट या दिवशी झाली.