हिंदु आणि ब्राह्मण द्वेष्टे प्रा. हरि नरके यांचे निधन !
मुंबई – हिंदु आणि ब्राह्मण द्वेष्टे विद्रोही लेखक प्रा. हरि नरके (वय ६० वर्षे) यांचे ९ ऑगस्ट या दिवशी मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १० ऑगस्ट या दिवशी होणार्या समता परिषदेत सहभागी होण्यासाठी ते पुण्यातून मुंबईमध्ये येत होते.
पुरोगात्मिवाच्या नावाखाली हिंदु धर्म आणि ब्राह्मण यांच्याविषयी त्यांनी अत्यंत द्वेषपूर्ण लिखाण केले. पुणे विद्यापिठात अथर्वशीर्षाचा अभ्यासक्रमात घेण्यास त्यांनी काही मासांपूर्वी विरोध केला होता. धर्मशास्त्राचा अभ्यास न करता हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांविरोधात त्यांनी अत्यंत धर्मद्रोही आणि एकांगी लिखाण केले. त्यांच्या हिंदुद्वेषी विचारांमुळे त्यांच्याशी त्याच विचारांची पुरोगामी मंडळी जोडली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्ताकाळात अनेक शासकीय पुस्तकांचे संपादन हरि नरके यांनी केले होते. पुणे विद्यापिठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते.