खासगी शाळांतील १९ सहस्र ३९४ जागा रिक्त !
पुणे – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमधील १९ सहस्र ३९४ जागा रिक्त असून ८२ सहस्र ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येते. यंदा ८ सहस्र ८२३ शाळांमधील १ लाख १ सहस्र ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा सूचीतील विद्यार्थ्यांसाठी ३ फेर्या राबवण्यात आल्या.