दौंड (पुणे) येथे नैराश्यातून शिक्षकांची आत्महत्या !
दौंड (जिल्हा पुणे) – येथील जावचीबुवाची वाडी परिसरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील १० विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थ्यांनी इतर शाळांमध्ये प्रवेश घेतला. या नैराश्यातून शिक्षक अरविंद देवकर यांनी तणनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. यांच्या आत्महत्येची गुप्तचर यंत्रणेकडून सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.