सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ‘राष्ट्रीय सत्सेवा’ सत्संगातील साधकांना जाणवलेले साधनेचे महत्त्व !
‘११.५.२०२३ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव साजरा झाला. त्यानिमित्त २८.४.२०२३ या दिवशी ‘ऑनलाईन’ झालेल्या ‘राष्ट्रीय सत्सेवा’ सत्संगात गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अध्यात्मप्रसाराचे कार्य आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये यांविषयी सांगितले गेले. या सत्संगात वर्णिलेली श्री गुरूंची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) महती ऐकल्यावर आणि गुरुदेव करत असलेले विश्वव्यापक कार्य समजल्यावर सत्संगात उपस्थित असलेल्या सर्वांची भावजागृती झाली आणि अंतर्मुखताही वाढली. हा सत्संग ऐकल्यावर ‘यापुढे साधनेचे प्रयत्न कसे करणार ?’, याविषयी जिज्ञासूंनी सांगितलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. सुधा साळुंखे : ‘जीवनात साधना करणे किती आवश्यक आहे ?’, हे समजले आणि साधना करण्याचा बुद्धीचा निश्चय झाला.
२. श्री. विवेक ढेरे : सत्संगात सांगितलेल्या आगामी काळाविषयी माहिती ऐकून आपत्काळाची जाणीव झाली. ‘स्वतः साधना करायला हवी अन् इतरांनाही सांगायला हवी’, असे वाटून सतर्कता निर्माण झाली.
३. श्रीमती शोभा मिर्जी : ‘अधिकाधिक साधना करून आध्यात्मिक प्रगती करायला हवी’, याची मला जाणीव झाली.
४. श्री. अक्षय देशमुख : माझ्या मनात साधनेविषयी गांभीर्य निर्माण झाले.
५. सौ. नीता गायकवाड : ‘वर्तमानकाळात राहून साधना करायची आहे’, याची मला जाणीव झाली.
६. सौ. वासंती परिपल्ली : सत्संग ऐकतांना मला ‘साक्षात् गुरुदेवच सत्संग घेत आहेत’, असे वाटले. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न वाढवून लवकरात लवकर गुरुचरणी जायला हवे’, याची मला जाणीव झाली.’
– सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (२९.४.२०२३)