(म्हणे) ‘मणीपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली !’ – राहुल गांधी
|
नवी देहली – मणीपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचारावरून काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष सरकारला लोकसभा अन् राज्यसभा येथे घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ९ ऑगस्टला दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत म्हटले की, पंतप्रधान मणीपूरला भारताचा भाग मानीत नाहीत. त्यामुळे ते अजूनही मणीपूरला गेलेले नाहीत. तुम्ही मणीपूरमध्ये ‘भारतमाते’ची हत्या केली आहे. तुम्ही विश्वासघातकी आहात. तुम्ही भारतमातेचे रक्षण करू शकत नाही.
संसद में अविश्वास प्रस्ताव पर चर्चा के दौरान कांग्रेस नेता राहुल गांधी ने केंद्र सरकार पर जमकर हमला बोला. #NoConfidenceMotion #RahulGandhi https://t.co/QhE1jLa6oN
— AajTak (@aajtak) August 9, 2023
संपादकीय भूमिकामणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी महिलांवर झालेले अत्याचार निषेधार्हच आहेत; परंतु लव्ह जिहादमुळे आजपर्यंत सहस्रावधी हिंदु महिलांचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यावरून गांधी महाशयांना भारतमातेची हत्या झाली, असे कधीच वाटले नाही, हेही सत्य जाणा ! |