धर्मांधांनी हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा नष्ट केल्या, तर ‘जुबेर खान’ या कर्मचार्याच्या औषधालयाला हातही लावला नाही !
नूंह येथील अलवर रुग्णालयावरील आक्रमणाचे प्रकरण !
नूंह (हरियाणा) – नूंह येथे ३१ जुलै या दिवशी धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचारात पुष्कळ हानी झाली. येथील अलवर रुग्णालयावरही आक्रमण करण्यात आले होते. त्या वेळी रुग्णालयातील भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या प्रतिमाही तलवारीने नष्ट करण्यात आल्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी हिंदूंनी एका वृत्तसंकेतस्थळाला दिली आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात ‘जुबेर खान’ असे लिहिलेले औषधालय (मेडिकल स्टोअर) आहे. संपूर्ण रुग्णालयाची नासधूस करण्यात आली, परंतु हे औषधालय सुस्थितीत आहे.
जहाँ भगवान राम की तस्वीर, वहाँ मुस्लिम दंगाइयों ने चलाए तलवार… जिस काउंटर पर लिखा है जुबैर का नाम, वहाँ खरोंच भी नहीं: अलवर अस्पताल का सच, जो राजदीप ने छिपाया
गिरोह विशेष को पसंद नहीं आएगी @STVRahul की ग्राउंड रिपोर्ट।#MewatTerrorAttack #NuhConspiracyhttps://t.co/NEGp3tywnp
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 9, 2023
१. या वेळी रुग्णालयातील गरोदर महिलांसाठी असलेल्या विभागावरही आक्रमण करण्यात आले. त्यामुळे तेथील गरोदर महिलांना जीव मुठीत धरून पळ काढावा लागला.
२. घायाळ झालेल्या पोलिसांना रुग्णालयात भर्ती करण्यात आल्याचे दंगलखोरांना ठाऊक असल्याने त्यांनी त्या विभागावरही आक्रमण केले. तेथील सीसीटीव्ही कॅमेरेही नष्ट करण्यात आले.
३. संपूर्ण रुग्णालयात तलवारीने आक्रमण करून अनेक दरवाजे तोडण्यात आल्याचे आता दिसते. अनेक ठिकाणच्या काचा फोडण्यात आल्या. यामध्ये अतीदक्षता विभागाचाही समावेश आहे.
संपादकीय भूमिका
( गंगा-जमुनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती) |