‘चंद्रयान ३’ आता चंद्राच्या अधिक जवळून मारत आहे घिरट्या !
बेंगळुरू (कर्नाटक) – भारताचे ‘चंद्रयान ३’ चंद्राच्या कक्षेत पोचून ५ दिवस झाले असून ९ ऑगस्ट या दिवशी त्याने पुढील टप्प्यात पर्दापण केले. आता चंद्रयान ३ हे किमान १७४ किमी ते अधिकाधिक १ सहस्र ४३७ किमी अंतरावरून चंद्राला घिरट्या मारत आहे. १४ ऑगस्टला ते चंद्राच्या अधिक जवळ जाणार आहे, अशी माहिती ‘इस्रो’ने ट्विटरद्वारे दिली.
Chandrayaan-3 Mission:
Even closer to the moon’s surface.Chandrayaan-3’s orbit is reduced to 174 km x 1437 km following a manuevre performed today.
The next operation is scheduled for August 14, 2023, between 11:30 and 12:30 Hrs. IST pic.twitter.com/Nx7IXApU44
— ISRO (@isro) August 9, 2023
‘चंद्रयान ३’ हे २३ ऑगस्ट या दिवशी चंद्रावर यशस्वीरित्या उतरेल, अशी इस्रोच्या वैज्ञानिकांसह भारतवासियांना आशा आहे.