नगर येथील राहुरी आणि अकोले तालुक्यांत ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे उघडकीस !
एका धर्मांधावर गुन्हा नोंद
नगर – या आठवड्यात राहुरी आणि अकोले येथे लव्ह जिहादची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. अकोले येथील २ प्रकरणांत पालकांनी अद्याप तक्रार केलेला नाही. वांबोरी परिसरातील शेख शाहनवाज आसिफ हा हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये फसवत असल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात नोंदवला आहे. त्याने फसवलेल्या ७ मुलींमधील एका मुलीने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितल्यानंतर त्याचे आसिफ याचे खरे स्वरूप उघड झाले. मुलीच्या वडिलांनी आसिफ याचा भ्रमणभाष घेतला असता, त्याच्या भ्रमणभाषमध्ये अनेक मुलींसमवेतची छायाचित्रे, ‘व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग्स’ मिळाले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. तो मुलींना ‘ब्लॅकमेल’ करत होता. संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर शेख याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअशा धर्मांधांना त्वरित शिक्षा झाल्यासच ‘लव्ह जिहाद’ची पुढील प्रकरणे थांबतील ! |