पुणे-मुंबई उद्यान एक्सप्रेसमध्ये महिलेचा विनयभंग करून तिला खाली ढकलणारा अटकेत !
मुंबई – मध्य रेल्वेवरील पुणे-मुंबई उद्यान एक्सप्रेसमध्ये महिलेचा विनयभंग करून तिच्याकडील रोख रक्कम बळजोरीने खेचून तिला एक्सप्रेसमधून ढकलणारा आरोपी मनोज चौधरी (वय ३२ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित महिला महिलांच्या सामान्य डब्यात बसली होती. गाडी रात्री ८.२७ वाजता दादर रेल्वेस्थानकात आली. त्या डब्यातील सर्व महिला उतरल्यानंतर पीडित महिला एकटीच डब्यात होती. हे पाहून आरोपी डब्यात चढला. त्याने महिलेचा विनयभंग करून तिच्या जवळील बॅग खेचून त्यातून रोख रक्कम काढून घेतली. महिलेने त्याचा प्रतिकार केला; पण झटापटीत त्याने तिला धावत्या एक्सप्रेसमधून ढकलून दिले. ती फलाटावर पडल्याने घायाळ झाली. महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
संपादकीय भूमिकामहिलांनो, चोरट्यांना धडा शिकवण्यासाठी आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आतातरी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिका ! |