कल्याण येथे शौचालयांची दुर्दशा; नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम !
|
कल्याण – येथील सूचक नाका परिसरातील शौचालयांची स्थिती अत्यंत भयावह आहे. शौचालयाच्या छताला लागलेली गळती, खिडक्यांची सताड उघडी दालने, तुटलेले दरवाजे, तुंबलेले पाणी, कधीही कोसळतील अशा स्थितीत असलेल्या भिंती अशी त्यांची दुर्दशा झालेली आहे. अशा शौचालयांमुळे महिलांची तर पुष्कळच गैरसोय होते. ‘याविषयी वारंवार आवाज उठवूनही परिस्थितीमध्ये काहीही पालट झाला नाही’, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.
परिसरात पुरुषांसाठी १४ शौचालये आहेत; पण त्यांपैकी केवळ ३ शौचालयेच चालू आहेत. महिलांसाठीही केवळ दोनच शौचालये चालू आहेत. या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे.
संपादकीय भूमिका‘स्वच्छ भारत’चे स्वप्न पहाणार्या देशातील एका राज्यातील एका शहरात शौचालयांची अशी दुःस्थिती होते, याचा सरकारने विचार करावा ! |