वाशिम येथे शालेय पोषण आहारातील डाळ आणि चटणी निकृष्ट दर्जाची !
वाशिम – जिल्ह्यात वितरीत होणार्या शालेय पोषण आहारातील डाळ आणि चटणी अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करून ‘लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणार्या कंत्राटदारावर पोलीस कारवाई करावी’, अशी मागणी केली. त्यांनी ही निकृष्ट डाळ आणि खिचडी सभागृहातच आणली.