पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या विरोधात पनवेल येथे गुन्हा नोंद
पनवेल – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर ११ सहस्र तलवारधार्यांच्या एकूण ३६० टोळ्या सिद्ध केल्याचा आरोप करून त्यामुळे ‘राज्यात देशात हिंसाचार भडकण्याची शक्यता’ असल्याची तक्रार अधिवक्ता अमित कटारनवरे यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात केली आहे. त्यांनी गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि पेरीयार नाईकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करून अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.