कल्याण येथे ४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्या आरोपीला अटक !
कल्याण – येथील रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षागृहातून एकाने ४ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. या प्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने ८ घंट्यांत मुलाचा शोध घेऊन त्याच्या आई-वडिलांकडे सोपवले. पोलिसांनी आरोपी कचरु वाघमारे याला अटक केली आहे. त्याला ४ मुली असल्याने मुलाच्या हव्यासापोटी त्याने या चिमुकल्याचे अपहरण केले होते. आरोपी मुलाला घेऊन नाशिक येथे पळून जाण्याच्या सिद्धतेत होता; मात्र त्यापूर्वीच नाशिक पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला पकडले.