कोंढवा (पुणे) येथे केलेल्या कारवाईत १५० किलो गोमांस जप्त !
पुणे – कोंढवा येथून कात्रजकडे ६ ऑगस्ट या दिवशी गोमांसाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती गोरक्षक राहुल कदम यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांचे सहकारी गोरक्षक हृषिकेश कामठे, सोनू मिसाळ, राहुल राठोड, तसेच पोलिसांच्या साहाय्याने गोमांसाची वाहतूक करणार्या टेंपोवर कारवाई केली. या वेळी वाहनचालक पळून गेला. टेंपोची पहाणी केली असता टेंपोमध्ये १५० किलो गोमांस आढळून आले. या प्रकरणी राहुल कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.