गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका चालू करणार ! – मुख्यमंत्री
मुंबई – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणेशोत्सवाआधी या महामार्गावरील एका मार्गिकेचे काम पूर्ण करण्याचा विचार आहे. मुंबई-सिंधुदुर्ग मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली.