मध्यप्रदेशातील ४ गावांत मुसलमान आणि ख्रिस्ती व्यापार्यांना प्रवेशबंदी !
लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांवर आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींनी घेतला निर्णय !
अशोकनगर (मध्यप्रदेश) – राज्यात सातत्याने समोर येत असलेल्या लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी अशोकनगर जिल्ह्यातील ४ गावांनी मुसलमान अन् ख्रिस्ती व्यापारी यांना गावात प्रवेशबंदी घातली आहे. जिल्ह्यातील धौरा गावाच्या पंचायतीच्या बैठकीमध्ये या स्वरूपाचा प्रस्ताव सरपंचाने ठेवला होता. यावर सर्व गावकर्यांनी अनुमोदन दिल्यानंतर हा निर्णय अंतिम करण्यात आला. यामुळे पंचायतीच्या अंतर्गत येणार्या ४ गावांमध्ये हा निर्णय लागू झाला आहे. ७ ऑगस्ट या दिवशी गावांतील चौकांमध्ये हा आदेश लिहिलेला फलकच लावण्यात आला आहे.
गांव में मुस्लिम व इसाई व्यापारियों की एंट्री पर प्रतिबंध, धर्म की जांच करने देखा जाएगा आधार कार्ड #MadhyaPradesh | #MPNews
— IBC24 News (@IBC24News) August 8, 2023
या फलकावर स्पष्टपणे लिहिले आहे की, ख्रिस्ती आणि मुसलमान व्यापार्यांना गावांत प्रवेश करण्याची अनुमती नाही. बाहेरून येणार्या व्यापार्यांनी त्यांचे आधारकार्ड सोबत ठेवावे. त्याची पडताळणी केल्यावरच त्यांना गावात येण्याची अनुमती देण्यात येईल. हा निर्णय सर्व गावकर्यांच्या अनुमतीनेच घेण्यात आला आहे.
(सौजन्य : मध्य प्रदेश तक न्यूज)
संपादकीय भूमिका
|