हिंदु दुकानदाराचा १० लाख रुपयांचा कपड्यांचा माल लुटून दुकान पेटवले !
३१ जुलैच्या नूंह (हरियाणा) येथील धर्मांध मुसलमानांच्या हिंसाचारातील एक हृदयद्रावक प्रसंग समोर !
नूंह (हरियाणा) – हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर आक्रमण करणार्या घटनेला आता ८ दिवस झाले असून धर्मांध मुसलमानांच्या कृत्यांचा घटनाक्रम बाहेर येत आहे. हे आक्रमण पूर्णत: पूर्वनियोजित असल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागत आहेत. अशातच जुम्मा बाजारमध्ये असलेल्या कपड्याच्या दुकानाचे मालक ओमकेश कुमार यांनी नोंदवलेला गुन्हा प्रसारमाध्यमांत चर्चिला जात आहे.
(सौजन्य : News18 India)
कुमार यांनी पोलिसांत प्रविष्ट केलेल्या तक्रारीनुसार ३१ जुलैच्या दुपारी ३ वाजता मुसलमानांच्या एका जमावाने त्यांचे बंद असलेल्या दुकानाचे कुलूप तोडले. दुकानात असलेल्या ९ – १० लाख रुपयांच्या कपड्यांचा माल लुटला आणि त्यानंतर दुकानाला आग लावली. यामध्ये दुकान जळून भस्मसात् झाले आहे. दुकानाच्या दोन्ही बाजूंना लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजचे अन्वेषण करण्याची विनंती कुमार यांनी पोलिसांकडे केली आहे.