नाम हाच आधार ।

सौ. नम्रता ठाकूर

पुढे व्‍यथा (टीप १) मागे कथा (टीप २)।
नाम हाच आधार ॥ धृ.॥

पारावरच्‍या झाडावर ।
किलकिलाट फार ॥
तेथेच मन रमे अपार (टीप ३) ।
नाम हाच आधार ॥ १ ॥

आजारी पडता सत्‍वर धावे वैद्याकडे ।
आराम पडता विसरून जाई वैद्यास ।
परि भवरोग कैसा निपटील ।
नाम हाच आधार ॥ २ ॥

आई-बाबांविना जन्‍म व्‍यर्थ ।
तैसे भावभक्‍तीविना नाम व्‍यर्थ ।
भावभक्‍तीसह होऊ दे नामोच्‍चार ।
नाम हाच आधार ॥ ३ ॥

शोधत होतो शांतीला ।
प्रेमात होतो शांतीच्‍या ।
परि भेटली ती मात्र श्री गुरुचरणी नामरूपे ॥
नाम हाच आधार ॥ ४ ॥

नाम हेच अमृत, नाम हेच शांतीचे रूप ।
गुरुचरणांचे स्‍थान असे शांतीचे धाम ।
गुरुराया, द्यावे मज आपुले चरणधाम ॥
नाम हाच आधार ॥ ५ ॥

टीप १ – कर्म

टीप २ – प्रारब्‍ध

टीप ३ – संसारात मन रमते.

– सौ. नम्रता ठाकूर (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), ठाणे (१२.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक