मुंबईला पाणीपुरवठा करणारे ७ तलाव ८० टक्के भरले !
मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव ८० टक्के क्षमतेने भरलेले आहेत. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा ७ तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. हा ८० टक्के पाणीपुरवठा मुंबईकरांसाठी ३०० दिवस पुरेल इतका आहे.