बाळे (सोलापूर) पुलानजीक पिण्याच्या पाईपलाईनला गळती !
महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय !
सोलापूर – मागील ३-४ दिवसांपासून बाळे पुलानजीक सोलापूर महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. स्थानिक नागरिकांनी याविषयी महापालिकेला वारंवार कळवूनही याची कोणतीही नोंद पालिकेकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रतिदिन लाखो लिटर पाणी व्यय होत आहे. एकीकडे सोलापूर शहराला ४-५ दिवसांनी पाणीपुरठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाण्याचा अशा प्रकारे अपव्यय होत आहे. या प्रकारामुळे ‘सोलापूर विभागाच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी झोपले आहेत का ?’, असा प्रश्न सामान्य जनता उपस्थित करत आहे. (पाणीगळती वेळीच रोखू न शकणारे सोलापूर महापालिका प्रशासन जनतेला नियमित पाणीपुरठा होण्यासाठी कधीतरी प्रयत्न करू शकेल का ? – संपादक)