पाचोरा (जळगाव) येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या विरोधात निषेध फेरी !
पाचोरा (जळगाव) – गोंडगाव येथील ७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या विरोधात पाचोरा शहरात ७ ऑगस्ट या दिवशी बंद पाळण्यात आला. सकाळी निषेध फेरी काढण्यात आली. या वेळी शहरातील व्यापार्यांनीही उत्स्फूर्तपणे बंद पाळला.