विजेच्या धक्क्याने मायलेकींचा मृत्यू !
नाशिक – ओझर येथे घराच्या छतावरून लोखंडी सळईने पेरू तोडतांना उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या धक्क्याने मायलेकींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ६ ऑगस्ट या दिवशी घडली. अधिक मासासाठी ही मुलगी माहेरी आली होती. तिचे पती आणि २ मुलांनाही विजेचा धक्का बसला; मात्र ते लांब फेकल्याने बचावले. गच्चीवरील पाण्याची टाकी फुटल्याने पूर्ण बंगल्यात वीजप्रवाह उतरला होता.