ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणजे अक्कल आली असे नाही ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार
मुंबई – औरंगजेबाने मंदिरे तोडली, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. इतके समकालीन पुरावे असतांना कुणीतरी काहीतरी फालतू बोलतो, याला काहीही अर्थ नाही. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणजे अक्कल आली, असे नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय प्रवचनकार आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी हिंदुद्वेषी लेखक भालचंद्र नेमाडे यांचा पाणउतार केला.
भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवात केलेल्या औरंगजेबाच्या उद्दात्तीकरण्याच्या वक्तव्याचा विरोधात डॉ. शेवडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले, ‘‘एकही समकालीन पुरावा नसतांना बिनदिक्कतपणे ठोकून द्यायचे, ही पुरोगामी म्हणवल्या जाणार्या लोकांची रित आहे. अन्यांनी त्याविषयी पुरावे देत रहायचे. खोट्याला पुरावा नसतो. तोंडात जीभ आहे, घशात स्वरयंत्र आहे आणि बोलण्याची ताकद आहे, एवढ्या ३ गोष्टींच्या जोरावर तुम्ही वाटेल ती बडबड केली, तर त्याचा प्रतिवाद लोकांनी काय म्हणून करावा ?’’