कसबे शिवथर (महाड) येथे भूमीतून मोठे आवाज !

महाडचे प्रांतअधिकारी, तहसीलदार, पोलिस आणि एनडीआरएफ यांची ग्रामस्‍थांशी चर्चा

महाड – कसबे शिवथर (जिल्‍हा रायगड) गावात गेले २ दिवस भूगर्भातून मोठे आवाज येत आहेत. त्‍यामुळे ग्रामस्‍थांमध्‍ये याची चर्चा चालू असून भीतीचे वातावरण आहे. काहींनी मंदिराच्‍या परिसरात आसरा घेतला आहे. ७ ऑगस्‍ट या दिवशी भूगर्भ शास्‍त्रज्ञांना पाचारण करण्‍यात आले होते. ‘हे आवाज नेमके कशामुळे येत आहेत ?’, याचे कारण स्‍पष्‍ट झालेले नाही.