वक्फ बोर्ड कायदा रहित करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
हिंदु जनजागृती समितीचे झारखंडमध्ये धनबाद आणि बोकारो येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन
धनबाद (झारखंड) – तत्कालीन काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार देऊन ठेवले होते. मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा बनवल्याचे वरवर दिसते; परंतु या कायद्याच्या माध्यमातून देशभर हिंदूंची घरे, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे एवढेच नाही, तर सरकारी संपत्तीही सहजपणे भूमी गिळंकृत करून ती वक्फ बोर्डाची संपत्ती घोषित करण्याचे षड्यंत्र चालू आहे. हा एक प्रकारचा ‘लँड (भूमी) जिहाद’ आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धनबाद आणि बोकारो येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांच्या नावे प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन धनबाद येथे उपायुक्त संदीपकुमार सिंह यांना देण्यात आले. या आंदोलनाला ‘तरुण हिंदू’चे उज्ज्वल बॅनर्जी, विश्व हिंदु परिषदेचे सुनील कुमार, शिवशक्ती मंदिराचे पंकज सिंह, धीरेंद्र पुरम, आर्य समाजचे राजेश बरनवाल, झरिया येथून निर्मल कजारिया, तसेच समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक शंभू गवारे, समरपाल सिंह आणि अमरजीत प्रसाद आदी सहभागी झाले.
बोकारो स्टील सिटीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये सर्वश्री रंजीत सिंह, राजेश सिंह, अनुसरंजन कुमार, मधुसूदन, योगेंद्र चौधरी, तसेच समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे, सर्वश्री समरपाल सिंह आणि अमरजीत प्रसाद सहभागी झाले होते.
जमशेदपूर येथे प्रशासनाला निवेदन सादर
वक्फ बोर्डाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी जमशेदपूर येथे प्रशासनाला निवेदन सादर केले. या वेळी अधिवक्त्या प्रणिता श्रीवास्तव, डी. प्रसाद, रवि महाराणा, आलोक पांडे, रंजना वर्मा, तसेच समितीच्या वतीने सर्वश्री सुदामा शर्मा आणि वि.वि. कृष्णा उपस्थित होते.