शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या भाषणाच्‍या जुन्‍या ध्‍वनीफितींच्‍या संदर्भात राज ठाकरे यांच्‍याशी चर्चा करणार ! – उद्धव ठाकरे

डावीकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे

मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची वर्ष १९६६ ते १९९० पर्यंतची भाषणे राज ठाकरे यांच्‍याकडे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्‍या स्‍मारकाच्‍या कामासाठी आवश्‍यकता असल्‍यास राज ठाकरे यांच्‍याशी संपर्क करू, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्‍हटल्‍याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी वर्ष १९९० च्‍या पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे त्‍यांनी ग्रामोफोनमध्‍ये ध्‍वनीमुद्रित करून संग्रहित केली होती.