कर्नाटकातील चिक्कमगळुरू येथील देवीरम्मा देवळात वस्त्रसंहिता लागू !
(मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावलीला वस्त्रसंहिता म्हणतात.)
चिक्कमगळुरू – तालुक्यातील ऐतिहासिक देवीरम्मा देवस्थानात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. देवीरम्माच्या देवस्थानात येणार्या भक्तांनी पारंपरिक वस्त्रांमध्ये येण्याविषयी देवस्थान कार्यकारी मंडळाने सूचना प्रसारित केली आहे. ‘मंदिरात येणार्या भक्तांनी स्कर्ट, मिडी, स्लीवलेस ड्रेस, पँट घालून देवालयात येऊ नये’, असा सूचना फलक मंदिराच्या समोर लावण्यात आला आहे. देवालयाच्या आवारात भ्रमणभाष, तसेच व्हिडिओ बनवणे आदी गोष्टींवरही बंदी घालण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकायाचा आदर्श कर्नाटकातील अन्य मंदिरांनीही घ्यावा ! |