तमिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांची अटक कायदेशीर ! – सर्वोच्च न्यायालय
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने काळा पैसा पांढरा केल्याच्या प्रकरणी (मनी लाँड्रिंगच्या प्रकरणी) तमिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुकचे मंत्री सेंथिल बालाजी यांची अटक कायदेशीर असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला मंत्र्याची कोठडीत चौकशी करण्याची अनुमती दिली.
जेल में बंद तमिलनाडु सरकार के मंत्री सेंथिल बालाजी को सुप्रीम कोर्ट से झटका, गिरफ्तारी के खिलाफ याचिकाएं खारिज#SupremeCourt #SenthilBalaji #TamilNadu #India https://t.co/RAAbqEkkv0
— ABP News (@ABPNews) August 7, 2023
सेंथिल बालाजी आणि त्यांच्या पत्नी एस्. मेगला यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या निकालात सेंथिल बालाजी यांची अंमलबजावणी खात्याने केलेली अटक कायम ठेवली होती. नोकरीसाठी रोख रक्कम घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सेंथिल यांच्या १२ ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी खात्याने मागितलेल्या कोठडीला अनुमती दिली.