(म्हणे) ‘पंडितांनी बायकांना भ्रष्ट केल्यामुळे औरंगजेबाने ज्ञानव्यापी मंदिराची तोडफोड केली !’ – भालचंद्र नेमाडे

  • हिंदुद्वेषी लेखक भालचंद्र नेमाडे यांना औरंगजेबप्रेमाचा उमाळा !

  • छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत गरळओक !

हिंदुद्वेषी लेखक भालचंद्र नेमाडे

मुंबई – औरंगजेबाच्या २ बायका काशी विश्‍वेश्‍वराच्या दर्शनाला गेल्या होत्या; पण त्या परत आल्या नाहीत. तेथे मंदिरातील पंडित बायकांना भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे. औरंगजेबाला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याने मंदिराची तोडफोड केली. ‘असली माणसे नकोत’ म्हणून त्याने काहींना मारले. पुढे इतिहासकारांनी ‘औरंगजेब हिंदुद्वेष्टा होता’, अशी नोंद केली, असे अकलेचे तारे हिंदुद्वेषी लेखक भालचंद्र नेमाडे यांनी तोडले. (छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारणार्‍या औरंगाजेबाचे उदात्तीकरण करणार्‍या अशा लेखकांना सरकारने कारागृहात टाकावे ! – संपादक) ५ ऑगस्ट या दिवशी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवाच्या सांगता समारंभात नेमाडे बोलत होते. या वेळी व्यासपिठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते. भालचंद्र नेमाडे यांच्या या वक्तव्यावरून सामाजिक माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

नेमाडे यांच्याकडून पेशव्यांवर अश्‍लाघ्य टीका !

पेशव्यांना धडा शिकवण्यासाठी इंग्रज आले. तेही बदमाश होते; परंतु पेशव्यांपेक्षा कमी बदमाश होते. औरंगजेबाच्या काळात अनेक मुसलमान राजांच्या राण्या हिंदू होत्या. त्या वेळी हिंदु-मुसलमान असा भेद नसायचा. शहाजहानची आई हिंदूच होती. औरंगजेबाच्या सैन्यात ५० टक्क्यांहून अधिक लोक हिंदू होते. त्या वेळी जे पेशवे होते, ते सगळे दुष्टच नाही, तर नीच वृत्तीचे होते. हा नानासाहेब पेशवा कुठेही गेला की, अल्पवयीन मुलींना ‘तयार’ ठेवायला सांगायचा. नानासाहेब पेशव्यांनी लिहिलेली ही पत्रे मी स्वत: वाचली आहेत. त्यामुळे खरा इतिहास समजून घ्या.’’ (निवळ ब्राह्मणद्वेषापायी पेशव्यांवर हीन टीका करणारे समाजात वैचारिक प्रदूषण निर्माण करत आहेत ! – संपादक)

लेखक भालचंद्र नेमाडे यांचे हिंदुद्वेषी भाषण (सौजन्य: TV9 Marathi)

(म्हणे) ‘शिवरायांचा हिंदूंपेक्षा मुसलमानांवर विश्‍वास होता !’

शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता. त्याचा स्वत:च्या लोकांवर (हिंदूंवर) विश्‍वास नव्हता. त्या वेळी हिंदू मुसलमान भेदच नव्हता, असेही अकलेचे तारे नेमाडे यांनी तोडले.

ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणजे अक्कल आली असे नाही ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार

डॉ. सच्चिदानंद शेवडे

मुंबई, ७ ऑगस्ट (वार्ता.) – औरंगजेबाने मंदिरे तोडली, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. इतके समकालीन पुरावे असतांना कुणीतरी काहीतरी फालतू बोलतो, याला काहीही अर्थ नाही. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणजे अक्कल आली, असे नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय प्रवचनकार आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी हिंदुद्वेषी लेखक भालचंद्र नेमाडे यांचा पाणउतारा केला.

भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवात केलेल्या औरंगजेबाच्या उद्दात्तीकरणाच्या वक्तव्याच्या विरोधात डॉ. शेवडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले, ‘‘एकही समकालीन पुरावा नसतांना बिनदिक्कतपणे ठोकून द्यायचे, ही पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या लोकांची रित आहे. अन्यांनी त्याविषयी पुरावे देत रहायचे. खोट्याला पुरावा नसतो. तोंडात जीभ आहे, घशात स्वरयंत्र आहे आणि बोलण्याची ताकद आहे, एवढ्या ३ गोष्टींच्या जोरावर तुम्ही वाटेल ती बडबड केली, तर त्याचा प्रतिवाद लोकांनी काय म्हणून करावा ?’’

मंत्री गिरीश महाजन भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्याविषयी म्हणाले, ‘‘नेमाडे यांनी हा चुकीचा इतिहास कुठून आणला, ते समजत नाही. वयोमानानुसार तुम्ही काहीही बोलावे, हे सहन करण्यापलीकडे आहे.’’

सौजन्य: Saam TV

शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील नेमाडे यांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त म्हणाले, ‘‘शहाजीराजे भोसले यांच्या निधनानंतर राजमाता जिजाऊ सती गेल्या नाहीत. अशी अनेक उदाहरणे इतिहासात पहायला मिळतात; पण या सामाजिक कार्याचे श्रेय औरंगजेबाला देणे चुकीचे आहे. प्रकाश आंबेडकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्यासारखे लोक औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत.’’


हे ही वाचा –

‘साठी बुद्धी नाठी’ नव्‍हे हिंदुद्वेषी !
संपादकीय
https://sanatanprabhat.org/marathi/708901.html
भालचंद्र नेमाडे यांच्‍यासारख्‍या हिंदुद्वेषी साहित्‍यिकांना राष्‍ट्रप्रेमी साहित्‍यिक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी रोखायला हवे !

संपादकीय भूमिका

अशा प्रकारची निराधार आणि तथ्यहीन वक्तव्ये करून हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणारे भालचंद्र नेमाडे हे वैचारिक आतंकवादीच होय ! औरंगजेबाची कुकृत्ये लपवण्यासाठी आणि त्याचे उदात्तीकरण करण्यासाठी साम्यवाद्यांनी हा खोटा इतिहास रचला. नेमाडे त्याचीच ‘रि’ ओढत आहेत !