चिखल्यांवर सोपा घरगुती उपाय
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २२२
‘पावसाळ्यात अधिक काळ पाण्यात पाय भिजल्यावर काही जणांना पायांच्या बोटांच्या बेचक्यांत एकप्रकारचा त्वचाविकार होतो. या विकाराला ‘चिखल्या’ म्हणतात. यामध्ये बोटांच्या बेचक्यांत भेगा पडणे, तेथील त्वचा ओलसर राहून तिला दुर्गंध येणे, खाज येणे, असे त्रास होतात. यावर पुढीलप्रमाणे सोपा उपाय करून पहावा.
प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी पाय साबण लावून स्वच्छ धुवावेत आणि बोटांच्या बेचक्यांत खोबरेल तेल लावावे. त्रास अधिक असल्यास तेल लावण्यापूर्वी निखार्यांवर धूप घालून येणारा धूर साधारण ५ मिनिटे पावलांवर घ्यावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan