बिबट्याच्या आक्रमणातून मिळाले जीवदान !
दौंड (पुणे) – काशिनाथ निंबाळकर (वय ५२) यांच्यावर रात्री साडेदहाला उसाच्या शेतात बिबट्याने झडप घालून त्यांची हनुवटी पकडली. ते मोठ्याने ओरडल्यावर पत्नी सरूबाई (वय ४५) आणि पाळीव कुत्रा त्यांच्या दिशेने धावून गेले. कुत्र्याने बिबट्यावर झडप मारली आणि सरुबाई यांनी बिबट्यावर लाकडाने प्रहार केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला. पतीला जीवदान देणार्या या सावित्रीचे आणि पाळीव कुत्र्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘या घटनेनंतर पिंजर्याच्या मागणी केली जाईले’, असे वनअधिकार्यांनी सांगितले.