पनवेल-नांदेड एक्सप्रेसमध्ये प्रचंड झुरळे !
२ घंटे पुण्याला थांबवून ‘पेस्ट कंट्रोल’!
पनवेल – पनवेल-नांदेड एक्सप्रेसमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात झुरळे झाली होती की, प्रवाशांनी ‘पेस्ट कंट्रोल’ केल्याविना गाडी पुढे जाऊ देणार नाही’, अशी कठोर भूमिका घेतली. शेवटी पुणे रेल्वे स्थानकावर २ घंटे रेल्वे प्रशासनाने पेस्ट कंट्रोल केल्यानंतरच गाडी पुढे गेली.