छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करणार्‍या धर्मांधाला अहिल्‍यानगर येथे अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

अहिल्‍यानगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी अरमान शेख याने ५ ऑगस्‍ट या दिवशी आक्षेपार्ह भाषेत बोलून ते ‘रेकॉर्ड’ केले. सदरची क्‍लिप प्रसारित होताच शेखला एका व्‍यक्‍तीने याविषयी भ्रमणभाष केल्‍यावर पुन्‍हा शेखने आक्षेपार्ह भाषेत वक्‍तव्‍य करून हिंदु समाजाच्‍या भावना दुखावल्‍या. ही ‘ऑडिओ क्‍लिप’ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित होताच याची माहिती जिल्‍हा पोलीस अधीक्षक ओला यांना मिळाली. त्‍यांनी एल्.सी.बी.च्‍या पथकाला अन्‍वेषण करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. निरीक्षक आहेर यांच्‍या मार्गदर्शनाखाली पथकाने अरमान शेख याला अर्ध्‍या घंट्यात शहरातून कह्यात घेतले. त्‍याला भिंगार कॅम्‍प पोलिसांकडे देण्‍यात आले असून त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

उद्दाम धर्मांध ! अशा धर्मांधांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !