वर्सोवा (मुंबई) समुद्रात बोट बुडून २ जण बेपत्ता !
मुंबई – शहरातील वर्सोवा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक बोट ५ ऑगस्टच्या रात्री ९.३० वाजता बुडाली. बोटीत ३ जण होते. त्यातील एकाने पोहत समुद्रकिनारा गाठला आहे. अद्याप दोघांचा शोध लागलेला नाही. उस्मानी भंडारी आणि विनोद गोयल ही बेपत्ता मासेमारांची नावे आहेत.