दौंड (पुणे) येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी कसायांना साहाय्य केल्याचा गोरक्षकांचा आरोप !
गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे २ गोवंशियांची हत्येपासून सुटका !
दौंड (जिल्हा पुणे) – खाटीक गल्ली येथील इदगाह मैदानाच्या मागे १ जर्सी गाय आणि वासरू हत्येसाठी आणले आहे, अशी माहिती ३ ऑगस्टला रात्री गोरक्षादल, महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक अक्षय कांचन यांना मिळाली. पोलिसांसह ते तेथे गेले असता, त्यांना हत्येनंतरचे ताजे रक्त आणि हाडे आढळून आली, तसेच १ जर्सी गाय अन् वासरू बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी पोलीस हवालदार सल्लाउद्दीन शेख यांनी केलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी कारवाई छोटी दाखवण्यासाठी आणि घटना स्थळावरील जनावरे पळवून लावण्यासाठी तिथे जाण्याच्या आधी कसायांना साहाय्य केले, असे स्थानिक गोरक्षकांनी सांगितले.
तेथील गोरक्षकांनी सांगितले की, दौंड येथे मोठ्या प्रमाणावर गोहत्या होत आहेत. पोलिसांनी तडीपार केलेले कसाई दौंड परिसरात वारंवार दिसत असतात. गोतस्करांची गाडी पकडायची नाही, आधी स्थानिक पोलिसांना सांगायचे, अशी सक्त ताकीद पोलीस उपअधीक्षक जाधव यांनी स्थानिक गोरक्षकांना दिली आहे.
संपादकीय भूमिका
|