(म्हणे) ‘केवळ गरीब मुसलमानांना केले जात आहे लक्ष्य !’- खासदार असदुद्दीन ओवैसी
हरियाणा सरकारच्या बुलडोझरद्वारे केलेल्या कारवाईवरून असदुद्दीन ओवैसी यांचा थयथयाट !
नवी देहली – नूंह येथील हिंसाचाराच्या विरोधात हरियाणा सरकारकडून चालू असलेल्या कारवाईवरून एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी थयथयाट करण्यास आरंभले आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक इमारती अथवा दुकानांवर बुलडोझर चालवून पाडल्याच्या कारवाईचा विरोध करत ते म्हणाले की, सरकार केवळ गरीब मुसलमानांनाच लक्ष्य करीत आहे. ही एकांगी कारवाई असून ज्यांनी हिंसाचार केला, ते बंदूक घेऊन मुक्तपणे फिरत आहेत. शेकडो गरीब मुसलमान बेघर झाले आहेत.
संपादकीय भूमिका
|