नूंह (हरियाणा) येथे हिंदूंच्या यात्रेवर दगडफेक करण्यात अग्रेसर असलेल्या ‘हॉटेल सहारा’वरही बुलडोझर !
एकूण ६०० इमारतींवर कारवाई !
नूंह (हरियाणा) – येथे हिंदूंच्या यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी सर्वांत आधी तिरंगा चौकातील ‘हॉटेल सहारा’च्या गच्चीवरून आक्रमण करण्यास आरंभ केला होता. तीन मजल्यांच्या या इमारतीवरून हिंदूंवर दगडफेक करण्यात आली होती. दंगलींच्या विविध व्हिडिओजमधून हे समोरही आले होते. हरियाणा पोलिसांनी आता या इमारतीवर बुलडोझर चालवत सर्व मजले पाडले आहेत. प्रशासनाचे म्हणणे आहे की, ही इमारत अनधिकृत होती. (इमारत अनधिकृत होती, तर इतकी वर्षे प्रशासनाने त्याच्यावर कारवाई का केली नाही ? – संपादक)
वर्ष २०१६ पासून हॉटेलच्या मालकाला यासंदर्भातील नोटीस दिली जात आहे, परंतु त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने ही कारवाई करण्यात आली, असे स्थानिक अधिकार विनेश कुमार यांनी सांगितले. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणा सरकारने आतापर्यंत ६०० हून अधिक अनधिकृत स्थानांना बुलडोझर चालवून नष्ट केले आहे.
Hotel Sahara was demolished by bulldozers in Haryana’s Nuh today- WATCH.
‘Stones were pelted from the hotel’s roof during the violence’, Nuh SDM speaks exclusively to @tejshreethought@roypranesh | #Nuh #Haryana pic.twitter.com/jrD4uzQArX
— TIMES NOW (@TimesNow) August 5, 2023
गुरुग्राम येथे हिंदु महापंचायतीचे आयोजन !नूंह येथील घटनेच्या निषेधार्थ ६ ऑगस्ट या दिवशी गुरुग्राम येथे हिंदु महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विश्व हिंदु परिषदेने सांगितले की, हिंसाचारामुळे पूर्ण होऊ न शकलेली जलाभिषेक यात्रा याच वर्षी पूर्ण केली जाईल. त्याचा दिनांक या महापंचायतीत निश्चित केला जाणार आहे. |