१०४ वाहनचालकांपैकी ७४ जणांची दृष्टी सदोष !
पनवेल येथे वाहनचालकांचे नेत्र आणि आरोग्य तपासणी शिबिर !
पनवेल – पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून तळोजा ब्रेक टेस्टिंग ट्रॅक येथे ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या अंतर्गत वाहनचालकांचे नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात एकूण १०४ वाहनचालकांपैकी ७४ जणांची दृष्टी सदोष असल्याचे आढळून आले.