अमित शहा यांच्या पुणे दौर्याच्या पार्श्वभूमीवर आपच्या कार्यकर्त्यांची धरपकड !
पुणे – गृहमंत्री अमित शहा यांच्या पिंपरी-चिंचवड मधील दौर्याच्या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट या दिवशी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची धरपकड करण्यात आली. सकाळी ७ वाजल्यापासूनच आपच्या पदाधिकार्यांना पिंपरी-चिंचवड मधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये स्थानबद्ध करण्यात आले असून जोपर्यंत अमित शहा शहरांमध्ये आहेत तोपर्यंत कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्येच ठेवले होते.